Breaking News

भंडारदरा येथे वामन दहन; आदिवासींनी केले बळीराजाचे पूजन

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - भारतीय मुलनिवासींचा राजा बळीराजा हा महाशुरवीर, पराक्रमी, वैभव संपन्न आणि न्याई होता. त्याच्या काळात सर्व  प्रजा सुखी समाधानी होती. सर्व जनतेला बालीराजाबद्दल आपुलकी वाटत होती. लोकप्रिय असलेल्या बळीराजाला वामनाने तीन पावले जमीन मागून कपटाने  संपविले. मात्र मूलनिवासी जनता अजूनही आपल्या राजाला विसरली नाही. ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ असे मोठया अत्मियेतेने त्यांचा गौरव दिन  साजरा करतात. बळीराजाच्या इतिहातून आपणही प्रेरणा घ्यायला हवी असे प्रतिपादन बामसेफचे अकोले तालुका अध्यक्ष बाळासाहेब खाडे यांनी भंडारदरा  (दर्‍याचीवाडी, ता.अकोले) येथे व्यक्त केले.
भंडारदरातील दर्‍याचीवाडी येथे बलीप्रतीपदेच्या दिवशी बळीराजा गौरवदिन व वामन दहन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणपत दिघे यांनी  बळीराजाचा पेहराव केला होता. बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील महिला मीराबाई खाडे, नयना दिघे यांनी बळीराजाचे पूजन  केले.
या कार्यक्रम प्रसंगी गणपत दिघे, पुणे जिल्हा आदिवासी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दशरथ खाडे, कोंडीराम खाडे, दत्ता खाडे, विशाल खाडे,  स्वप्नील खाडे, राजेंद्र खाडे, अशोक खाडे, योगेश खाडे, वाळू खाडे, मीनानाथ खाडे, समाधान झाडे, सचिन दिघे, संजय खाडे, सुरेश दिघे आदि उपस्थित  होते. यावेळी बाळासाहेब खाडे म्हणाले की, भारतीय समाजाला अजूनही बळीराजाच्या वैभवशाली राज्याची गरज आहे. वामन प्रवृत्तीची लोक बळीराजाच्या  आत्महत्या थांबवू शकले नाहीत त्यामुळे बलीराज्य निर्माण करण्यासाठी समाजाचे प्रबोधन व परिवर्तन होणे गरजेचे आहे.भारतीय समाजाने बळीराजाचे विचार  अंगीकारल्यास नक्कीच समाज घडेल. कार्यक्रमाचे सूत्र संचलन कोंडीराम खाडे यांनी केले तर राजेंद्र खाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.