Breaking News

ओसाड, निर्मनुष्य परिसरात वसले नगर तालुका पोलीस ठाणे!

अहमदनगर, दि. 22, ऑक्टोबर - भिंगारमधील दुर्लक्षित आणि ओसाड, निर्मनुष्य परिसरात नगर तालूका पोलीस ठाण्याचा कारभार नुकताच सुरु झाला  आहे. लष्करी परिसर असल्याने देशभरातील लोक या परिसरात नोकरीनिमित्त येत असतात. त्यामुळे या पोलीस ठाण्यावर फार मोठी जबाबदारी येऊन  पडली आहे. विशेष म्हणजे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून हे पोलिस ठाणे स्थलांतरित करण्याचे अनेक पोलीस अधिकार्‍यांनी प्रयत्न केले. मात्र त्यांना यश  आले नाही. 
मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनशाम
पाटील, ग्रामीणचे उपधीक्षक आनंद भोईटे, शहर विभागाचे उपाधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस निऱिक्षक पवार, परमार आणि चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  सपोनि किशोरकुमार परदेशी यांनी केलेल्या पाठपुराव्याला आणि परदेशी यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला अखेर अभूतपूर्व यश आले.
भिंगार पोलीस लाइनजवळील ओसाड  आणि जुनाट इमारतीमध्ये हे पोलीस ठाणे  स्थलांतरित करण्यात आले आहे.
मात्र सपोनि परदेशी यांनी हा परिसर अत्यंत  स्वच्छ केले. या जागेत नागरिकांना आणि पोलीस कर्मचार्‍यांना त्यांची वाहने लावण्यासाठी जागा नव्हती.  परिसरातील सर्वत्र पसरलेली दुर्गंधी, महिला आणि पुरुषांच्या स्वच्छतागृहाचा अभाव, पिण्याच्या पाण्याची समस्या या सर्व समस्यांमधून सपोनि परदेशी  आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मार्ग काढत नगर तालूका पोलीस ठाणे आकर्षक केले. पूर्वीच्या नगर तालुका पोलीस ठाण्याच्या झेंडीगेट परिसर हद्दीत जर एखादी  अप्रिय घटना घडली तर पूर्वीच्या या पोलीस ठाण्यातून पोलिसांना बाहेर पडायला अर्धा तास वेळ लागायचा. मात्र त्या तुलनेत हा परिसर एकदम मोकळा  असून पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्याकामी खूप कमी कालावधी लागणार आहे. दरम्यान, पोलीस नाईक आनंद सत्रे, बापू फोलाने, विनोद पवार, शाबीर  शेख, संदीप जाधव, देवा पळसे आणि तमनर आदींनी अहोरात्र मेहनत घेऊन हे पोलीस ठाणे आकारास आणल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक शर्मा यांच्या  हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, या पोलीस  ठाण्याच्या मागील मोकळया जागेत भविष्यात पोलिसांसह आम जनतेसाठी मंगलकार्यालय बांधण्याचा निर्धार परदेशी केला आहे.