’जीएसटी’ने सुकामेवा महाग; मिठाईवर मात्र परिणाम नाही...
सोलापूर, दि. 09, ऑक्टोबर - जीएसटी’(वस्तू सेवा कर) या नव्या कर प्रणालीच्या व्यवहाराची ही पहिली दिवाळी मिठाई गोड करणारी ठरली असली तरी एकूणच परिणाम म्हणून मागणी घटल्याचे मिठाई विक्रेत्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे 12 टक्के ’जीएसटी’मुळे सुकामेवा महागला आहे. वेगवेगळ्या सुकामेव्याचे एकच गिफ्ट पॅकेट घ्यायचे म्हटल्यावर त्यावर साधारण 15 ते 18 टक्के ’जीएसटी’ असल्याने सुट्या खरेदीवर भर असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीचे उत्सव सुरू होतील. त्यामुळे खरेदीची लगबग हळूहळू मार्केटमध्ये दिसू लागली आहे. यंदाची दिवाळीची उलाढाल जीएसटीच्या कर आकारणीवरून होत आहे. त्याचे काही परिणाम जाणवू लागले आहेत. सोलापुरातील मिठाई क्षेत्रावर फारसा परिणाम जाणवत नाही. मागील वर्षीचे मिठाईचे दर यंदाच्या वर्षी देखील कायम आहेत. मात्र ’जीएसटी’च्या झालेल्या एकूण परिणामामुळे मंदी जाणवते आहे. त्याचा मिठाई विक्रीवर 20 ते 25 टक्के परिणाम झालेला आहे. विक्री घटली असल्याचे विक्रेते म्हणाले. सुक्या मेव्यावर 12 टक्के कर लागल्याने यंदा दिवाळीसाठी भेट देण्यात येणारा ड्रायफ्रूट बॉक्सही आता काही प्रमाणात महाग झाला आहे. दिवाळीच्या सणात फराळाच्या पदार्थांना महत्त्वाचे स्थान आहे तसेच आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार फराळ तसेच सुक्या मेव्याचे बॉक्सचा सर्रास वापर होतो. जीएसटीमुळे सर्वच वस्तूंची भाववाढ झाली आहे. विविध प्रकारच्या मिठाई आणि चिवड्यांमध्ये या सुक्या मेव्याचा वापर केला जातो. त्यामुळे दिवाळीचा फराळदेखील या जीएसटी चक्रातून सुटलेला नाही. पॅकिंग बॉक्सचेही असेच आहे. मिनी ते जंबो अशा प्रकारातील गिफ्ट बॉक्सचे दरही वेगवेगळे आहेत. तसेच यांच्या किमतीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ड्रायफ्रूटच्या किमतीत तब्बल टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी ड्रायफ्रूटवर टक्के कर द्यावा लागत होता. यंदा मात्र 12 टक्के कर द्यावा लागतो आहे. सुका मेव्याचे दर सातत्याने बदलत असतात. रविवारी शहरातून काही दुकानातून मिळालेले दर पुढील प्रमाणे आहेत. दर असे (प्रति किलोग्रॅम) काजू: 850 ते 1200 बदाम : 700 अमेरिकन बदाम : 700 ते 800 मामरा बदाम : 1200 ते 1500 पिस्ता : 1200 ते 1400 नमकीन पिस्ता : 800 ते 1000 सुगरी खारीक : 200 ते 250 साधी खारीक : 150 भारतीय मनुके : 150 ते 200 अफगाणी मनुके : 250 ते 300 चारोळी : 650 ते 700 खसखस : 600 सुमारे 80 रुपयांची वाढ
’’मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी प्रत्येक सुक्या मेव्याच्या दरात किलोमागे 50 ते 80 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याला घराघरात फराळ करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत याचा वापर होतो. जीएसटीची झळ बसली आहे, हे सरळ सरळ दिसते’’. - मल्लिकार्जुनवाले, भुसार आडत व्यापारी
’’मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी प्रत्येक सुक्या मेव्याच्या दरात किलोमागे 50 ते 80 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याला घराघरात फराळ करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत याचा वापर होतो. जीएसटीची झळ बसली आहे, हे सरळ सरळ दिसते’’. - मल्लिकार्जुनवाले, भुसार आडत व्यापारी