Breaking News

सहारा ऑल इज वेल; नागपुरात कंपनी प्रशासनाचा दावा

नागपूर, दि. 24, ऑक्टोबर - वादात अडकलेला सहारा उद्योग समूह आता पुन्हा बाजारपेठेत आपली पत नव्याने निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून  नागपुरात आयोजित कार्यक्रमात सहारा समूहातर्फे कंपनीच्या कारभारासंदर्भात कंपनीच्या कायदेतज्ज्ञांनी बनवलेला अहवाल सादर करण्यात आला. यावेळी सहारा समूहाचे प्रमुख  सुब्रत रॉय देखील उपस्थित होते.
याप्रसंगी सादर केलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार 2012 पासून न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली सहाराने सातत्याने सहारा-सेबी खात्यात सुमारे 19 हजार कोटी रूपये जमा केले  आहेत.
सेबीने गेल्या 60 महिन्यात गुंतवणूकदारांना केवळ रु. 64 कोटी इतकीच रक्कम परत केली आहे. तसेच, सेबीकडे सहाराच्या मालकीच्या रु. 20 हजार कोटी किमतीच्या जमिनीची  मूळ कागदपत्रे जमा आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या ओएफसीडी गुंतवणूकदारांपैकी 95% लोकांना त्यांची देणी दिल्यानंतर सहाराने हे 19 हजार कोटी भरले आहेत. आता हे म्हणजे एकाच  जबाबदारीसाठी दोन वेळा पैसे देणे आहे. सहाराने पैसे परतफेड केल्याची सर्व कागदपत्रे सुद्धा सादर केली आहेत. यात व्हाउचर, रोखे प्रमाणपत्र, इतर मुदतपूर्ती कागदपत्रे व पावत्या,  इत्यादीचा समावेश आहे. आम्हाला असा विश्‍वास आहे की एकदा सेबीने याची खातरजमा केली, ज्याची आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकर सुरुवात करण्याची  विनंती करतो आहोत, जमा केलेली ही सर्व रक्कम सहाराकडे परत येईल. सहाराचे सर्व गुंतवणूकदार अस्सल आहेत व सहाराने आधीच आपल्या 95 टक्के गुंतवणूकदारांचे पैसे परत के ले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.