Breaking News

महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात अज्ञात इसमाचा खून

अहमदनगर, दि. 24, ऑक्टोबर - राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात धर्माडी टेकडीजवळ 30 ते 35 वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. राहुरी खुर्दचे पोलीस पाटील  बबनराव आहिरे यांनी यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पो. नि. प्रमोद वाघ, स. पो. नि. दिलीप राठोड आदींसह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.  पोलिसांनी नगरहून श्‍वानपथक बोलवून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी मिश्का नावाच्या श्‍वानाला अज्ञात इसमाच्या मृतदेहाजवळील वस्तूंचा वास दिला. त्यानुसार हे श्‍वान नगर-मनमाड महामार्गापर्यंत गेले. या श्‍वानाने वासाच्या साहाय्याने माग क ाढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. सदर इसमाचा मृतदेह नग्नावस्थेत असून मृताच्या डोक्यात मोठा दगड घालून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी  दिसत आहे.
या इसमाच्या उजव्या हातावर नागाचे चित्र गोदले असून ओम ए. हयाई अशी अक्षरे गोंदलेली आहे. मृतदेहाजवळ रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळुण आल्या आहे. हा खून रात्री  झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मयताची ओळख पटण्यासाठी कोणताही ठोस पूरावा पोलीसांच्या हाती अद्यापपर्यंत लागला नाही.
अप्पर पोलिस अघिक्षक घनश्याम पाटील, पोलिस  उपअधिक्षक अरुण जगताप, राहुरीचे पो. नि. प्रमोद वाघ, स. पो. नि. दिलीप राठोड आदींसह महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या  राहुरीचे सुरक्षा अधिकारी गोरख शेटे अधिक तपास करत आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरु आहे.