Breaking News

मॉकड्रील: पेट्रोल टँकरला आग लागली, पळापळा

सोलापूर, दि. 13, ऑक्टोबर - जुना तुळजापूर नाका येथे पेट्रोल टॅँकरला आग लागल्याचे समजताच अग्निशमन पथक धावत आले. घटनास्थळी टँकरला आग नसल्याचे लक्षात  आले तरी अग्निशमनच्या पथकाने फोमसह दोन बंब पाणी टँकरवर फवारले. सिव्हिलची रुग्णवाहिका तर डॉक्टरांविनाच आली. पोलिसांची गाडी वेळेत आली, पण त्यांना मॉकड्रील  असल्याची भूणभूण आधीच माहिती होते हे त्यांच्या हालचालीवरून दिसून आले. महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेचे पथक तर चित्रपटात शूटिंगला यावे या पद्धतीनेच आले होते..  सर्व विभागाच्या पथकांची हालचाल सांगून मॉकड्रील केल्याची होती.13 ऑक्टोबर या जागतिक आपत्ती निवारण दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर निरनिराळे उपक्रम राबवण्याच्या सूचना जिल्हा  प्रशासनाने सर्व यंत्रणेला दिल्या. यानंतर आपत्ती विभागाच्या वतीने गुरुवारी तुळजापूर नाका येथील मॉक ड्रील घेण्यात आले.महापालिकाआपत्ती विभागाचे कर्मचारी तर फिल्मी  स्टाईलने 5.24 वाजता घटनास्थळी एका डंपरमधून आले. हातात खोर्‍या-फावडा घेऊन डुलत-डुलत पोहोचले. रुग्णवाहिका 5.17 वाजता आली, चालकाशिवाय कोणीच नव्हते. डा ॅक्टराविनाच ती आली, मॉकड्रील असल्याची माहिती सर्वच यंत्रणेला असल्याने हे वातावरण होते. नागरिकही करमणूक म्हणूनच याकडे पाहत राहिले.