Breaking News

तिसरी मास्टर्स खुली पंचरंगी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

ठाणे, दि. 12, ऑक्टोबर - इंडिया मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स आणि मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स ऑफ महाराष्ट्र तर्फे 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान पंचरंगी अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  मुंबई विद्यापीठाच्या मारिन लाईन्स येथील क्रीडा संकुलात रंगणार्‍या या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील विविध वयोगटातील धावपटूंना सहभागी  होता येईल. त्यात 6,8,10, 12, 14, 16, 18 वर्ष गटाच्या मुले मुली, 20 वर्षाखालील मुले , महिला आणि पुरुष असे गट असतील. या स्पर्धेत 50 मीटर धावणे, 100 मीटर  धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे , 1500 मीटर धावणे, 3000 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे, 110 मीटर हर्डल्स, रिले, लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळा फे क, भाला फेक, थाळी फेक आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तिघा विजेत्यांना रोख बक्षिसाने गौरवण्यात येईल. स्पर्धेच्या प्रवेशिका स्विकारण्याची मुदत  वाढवण्यात आली असून, प्रवेशिका 15 ऑक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येतील. प्रवेशिका आणि अधिक माहितीसाठी इंडियन मास्टर्स अ‍ॅथलेटिक्सचे महासचिव जेरी डिसोझा (  9821130693 ) यांच्याशी आर- 3, 506 स्वामी समर्थ सोसायटी, दादोजी कोंडदेव स्टेडियमच्यासमोर ठाणे पश्‍चिम येथे सकाळी 9.30 ते 12.30 , दुपारी 4.30 ते 8.00 वाजेपर्यत  किंवा विकास चव्हाण यांच्याशी (9082775719) संपर्क साधावा.