Breaking News

दु:खाची स्वगते वाचणे हा एक अवर्णनीय आनंदाचा ठेवा आहे - डॉ. संदीप सांगळे

अहमदनगर, दि. 12, ऑक्टोबर - माणसाचं जगणं, त्याचा स्वभाव, वर्तन आणि त्याच्या आपापसातील नातेसंबंधांवर आधारीत भाष्य करताना मानवी व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे समोर  आणून प्रख्यात साहित्यिक जयवंत दळवी यांनी ऐंशीच्या दशकात समाजाला अंतर्मूख करणार्या साहित्याची निर्मिती केली.त्यांच्या निधनानंतर तब्बल 23 वर्षांनी डॉ.संजय कळमकर यांनी  दळवींच्या 22 कादंबर्यांचा वेध घेऊन जाणिवा आणि नेणिवांच्या पलिकडचा अस्वस्थतेचा हुंकार आपल्या दु:खाची स्वगते या ग्रंथात शब्दबध्द केलेला आहे.हा ग्रंथ वाचणे म्हणजे  अवर्णनीय आनंदाचा ठेवाच आहे,असे गौरवोदगार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिका या मासिकाच्या संपादक मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉ.संदीप सांगळे यांनी काढले.
लोकांना वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अहमदनगर शाखेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या च्वाचू आनंदे.!ज् या उपक्रमांतर्गंत डॉ.संजय कळमकर यांनी लि हिलेल्या दु:खाची स्वगते या ग्रंथावर आधारित पुस्तक निरूपण आणि चर्चासत्रात ते बोलत होते.ज्येष्ठ साहित्यिक सदानंद भणगे,मसापचे कार्यवाह आणि समीक्षक प्रा.डॉ.चं.वि.जोशी यांनी या  चर्चासत्रात सहभाग घेतला.मसापचे अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के अध्यक्षस्थानी होते.लेखक डॉ.संजय कळमकर,मसापच्या अधिदेशक डॉ.मेधा काळे यावेळी व्यासपिठावर उपस्थित होत्या.डा ॅ.सांगळे म्हणाले,जयवंत दळवींनी सारे प्रवासी घडीचे,वेडगळ,धर्मानंद, महानंदा,अधांतरी,चक्र अशा एकापेक्षा एक कांदंबर्यांची निर्मिती करून सकस साहित्य वाचकांना दिलं.त्यांच्या प्रत्येक क ादंबरीतून व्यक्त होणारं पात्र कल्पनेतले असले तरी ते आपल्या जीवनशैलीवर आणि स्वभावावर भाष्य करून जातं.त्यांच्या या सर्व कादंबर्यांमधील विचारांचा परामर्ष डॉ.कळमकर यांनी  दु:खाची स्वगते या ग्रंथात शब्दबध्द केला आहे.प्रा.डॉ.चं.वि.जोशी यांनी जयवंत दळवींनी विविध कादंबर्यांमधून रेखाटलेली पात्रं आणि त्यांची व्यक्तिमत्व यावर प्रकाशझोत टाकला.ते  म्हणाले धर्मानंद, शिवा,दिगंबर ही पात्रे अस्वस्थ,विस्कटलेले कुटूंब,मुळापासून उखडलेला कुटूंबातील प्रत्येक माणूस,जो स्वत:च्या दु:खाला गोंजारतो आहे.एकमेकाच्या दु:खाचे कोणाला क ाहीच देणे घेणे नाही की ते कमी करण्याचा प्रयत्न नाही.कोणतीच दोन माणसं एकमेकांशी मोकळेपणाने बोलत नाहीत.कुठलाच धागा असा नाही की त्याने सर्वांना एकत्र बांधून ठेवावे अशा  कौटूंबिक परिस्थितीचे अस्वस्थ करणारे वर्णन करतात.या पात्रांशी कधीकधी आपलाही फार जवळून संबंध आहे,असं वाटायला लागतं.हीच दळवींच्या लिखाणाची खरी गंमत आहे.डॉ.क ळमकरांनी दळवींचे साहित्य प्रबंधासाठी निवडून आपल्यातील अस्वस्थ पण दर्जेदार साहित्यिकाची पावती दिली आहे.
सदानंद भणगे यांनी जयवंत दळवी यांच्या अनेक नाट्यसंहितांचा उल्लेख करून दळवी हे केवळ दु:ख वाटणारेच साहित्यिक नव्हते तर त्यांनी विनोदाच्या अंगाने जाणार्या साहित्याची निर्मिती  करून समाजातील विसंगतीवररही मार्मिकतणाने बोट ठेवले होते. डॉ.कळमकरांनी त्यावरही समीक्षा करून सुखाची स्वगते लिहावीत,अशी सुचना केली.डॉ.कळमकर हे विनोदी कथाकार  असले तरी दळवींच्या कादंबर्यांचा विवेचनात्मक अभ्यास करताना त्यांनी तो वेदना,दु:ख,अहंकार,राग,लोभ,प्रेम अशा भावनांना सहज सुलभ भाषेत मांडण्याचं काम या ग्रंथात केले आहे.ते  निश्‍चितच स्पृहणीय असल्याचे त्यांनी नमूद केले.मसापचे अध्यक्ष अनिरूध्द देवचक्के यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून च्साहित्य हे नेहमी वाचकांना जगण्याची प्रेरणा देते.मनाला वेदना  देणार्या, शल्य पोहोचविणार्या अशा कितीतरी घटना आजुबाजुला घडत असल्या तरी अंत:प्रेरणा सदैव जागृत असते.तीला कृतीप्रवण करण्यासाठी,जगण्याचा आनंद मिळविण्याची आणि  आयुष्यात नविन काहीतरी चांगलं घडविण्याची इच्छा प्रबळ करण्याची ताकद केवळ साहित्यातच असते.निखळ आनंद प्राप्त करण्यासाठी सर्व महान साहित्यिकांच्या लिखाणाची पारायणं  व्हायला हवीत.तशी संधी डॉ. कळमकर यांनी उपलब्ध करून दिली आहे.अशा शब्दात कळमकरांचा गौरव केला.यावेळी डॉ.संजय कळमकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले.ते  म्हणाले,जयवंत दळवी यांची प्रत्येक कादंबरी वाचून संपविली की मनभर दाटणारी अस्वस्थता,हुरहुर,बधिरता विलक्षण असायची.दळवींच्या पात्रांचे जगण्याचे संदर्भच अत्यंत वेगळे पण  वास्तव आहेत.अस्पर्श विषयांना केलेला स्पर्श,धाडसी मांडणी,प्रवाही व स्वाभाविक भाषा,नात्या-गोत्यातील अज्ञाताचा शोध घेणारी पात्रे,मानवी संबंधांचे,अगम्य पापुद्रे उलगडून दाखविणारा  आशय,लैंगिक असमाधानातून आयुष्याची होणारी होरपळ या चक्रव्युहातून भिरभिरणारी दळवींची पात्रे मनावर ठसत गेली.त्यांच्या साहित्याचा प्रभाव पडत गेल्याने आपण दळवींच्या कादंबर्या  संशोधनासाठी निवडल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.