Breaking News

ऐतिहासिक वास्तू सभोवतालच्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाची कठोर भूमिका

औरंगाबाद, दि. 01, नोव्हेंबर - औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक वास्तू सभोवतालच्या अतिक्रमणांबाबत प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली असून ती काढण्यासाठी येत्या डिसें बर महिन्यापर्यंत मुदत दिली आहे.
औरंगाबाद शहरास जागातिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तडॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत  होते. ऐतिहासिक दृष्ट्या वारसा संवर्धन होण्यासाठी व शहराच्या व पर्यटन विकासासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद शहर ते जागतिक वारसा शहर म्हणून युनेस्कोद्वारे घोषित  होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाब आता प्र्रयत्न सुरू आहेत.