Breaking News

ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारताचा सर्वात मोठा विजय

नागपूर, दि. 02, ऑस्टोबर - विराट कोहलीच्या टीम इंडियाने नागपूरच्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच वन डे सामन्यांची मालिका  4-1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 ने मालिका जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात वेळा पाच  किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांची मालिका झाली. यामध्ये भारताने दोन वेळा ऑस्ट्रेलियावर 3-2 ने मात केली. भारताने पहिल्यांदा 1986 आणि दुसर्‍यांदा 2013  साली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात 55 सामने खेळले आहेत. यापैकी 24 सामन्यात भारताने विजय मिळवला, तर 26 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा  लागला. तर पाच सामने अनिर्णित राहिले. नागपूर वन डेत भारताने विजय मिळवल्याने हा आकडा 26-25 असा झाला आहे. भारतीय संघानं या विजयासह  आयसीसीच्या वन डे सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर झेप घेतली. त्यामुळं कसोटी आणि वन डे या दोन्ही फॉरमॅट्समध्ये एकाचवेळी नंबर वन होण्याचा मान  टीम इंडियाला मिळाला आहे.