Breaking News

युती सरकार पायउतार झाल्याशिवाय अच्छे दिन अशक्य - अशोक चव्हाण

औरंगाबाद, दि. 01, नोव्हेंबर - युती सरकारच्या काळात महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेतक-यांच्या आत्महत्या वाढतच चालल्या आहेत. नागपूर तर गुन्हेगारीची  राजधानी झालेली आहे. हे सरकार केवळ बालिशपेक्षा अधिक आहे. या सरकारला आपला वाढदिवस साजरा करण्याचा काहीही अधिकार नाही. हे सरकार पायउतार झाल्याशिवाय  अच्छे दिन येणार नाहीत, अशी कठोर टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली. 
मंगळवारी सकाळी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नंतर पत्रकारांशी  बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील राज्य सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरले आहे. शेती, शेतक यांचे प्रश्‍न, महिला, दलित, अल्पसंख्यक, शिक्षण, रोजगार अशा सर्व  आघाड्यांवरची या सरकारची कामगिरी अयशस्वी ठरली आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे तर प्रचंड नुकसान झाले आहे. विकास दर घटत आहे, महागाई आकाशाला भिडली आहे.  या सरकारच्या काळात राज्यात धर्मांध शक्तींनी त्यांची मनमानी चालविली आहे. हे सरकार पायउतार झाल्याशिवाय जनतेला अच्छे दिन दिनसे अशक्य आहे असे ते म्हणाले.