Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यात दोन वर्षांत 170 कोटीच्या निधीतून 314 किलोमीटरचे रस्ते

रत्नागिरी, दि. 01, नोव्हेंबर - रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून गेल्या दोन आर्थिक वर्षांत 314 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली. या कामांना  सुमारे 170 कोटी रुपये मंजूर झाले, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. 
रत्नागिरी जिल्ह्यामधील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या 2017-18 व 2018 -19 या आर्थिक वर्षांसाठी जिल्ह्यातील सुमारे 314 किलोमीटर रस्त्यांना मान्यता देण्यात आली आहे.  यासाठी सुमारे 170 कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कोअर नेटवर्क तालुकानिहाय गुणांकन यादीप्रमाणे रस्ते घेण्याबाबत या योजनेचे जिल्हा निवड  समिती सदस्य आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, कोकण भवन, ठाणे तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सदस्य अधीक्षक अभियंता  रा. म. गोसावी, सदस्य सचिव मुख्यमंत्री ग्रामसडक योजना उ. चं. मुळे, जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील उपभियंता माने, कुंभार, देशमुख यांच्या समवेत समितीला  मिळालेली निवेदने तसेच पत्रे यांबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी तालुकानिहाय रस्त्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार मंडणगड  तालुक्यासाठी 2017-18 साठी 9.77 कि. मी., 2018-19 साठी 8.20 कि.मी., दापोली तालुक्यासाठी 2017-18 साठी 16.47 कि. मी., 2018-19 साठी 16.68 कि.मी.,  खेड तालुक्यासाठी 2017-18 साठी 9.77 21.78 कि. मी., 2018-19 साठी 19.78 कि.मी., गुहागर तालुक्यासाठी 2017-18 साठी 7.69 कि. मी., 2018-19 साठी  12.29 कि.मी., चिपळूण तालुक्यासाठी 2017-18 साठी 18.79 कि. मी., 2018-19 साठी 21.39 कि.मी., संगमेश्‍वर तालुक्यासाठी 2017-18 साठी 29.31 कि. मी.,  2018-19 साठी 24.03 कि.मी., रत्नागिरी तालुक्यासाठी 2017-18 साठी 16.53 कि. मी., 2018-19 साठी 17.84 कि.मी., लांजा तालुक्यासाठी 2017-18 साठी 13.34  कि. मी., 2018-19 साठी 13.66 कि.मी., राजापूर तालुक्यासाठी 2017-18 साठी 24.58 कि. मी., 2018-19 साठी 23.13 कि.मी. रस्त्यांना मंजुरी देण्यात आल्याची मा हिती पालकमंत्री वायकर यांनी दिली. या 2017 -18 व 2018 -19 या आर्थिक वर्षासाठी सुमारे 314 किलोमीटर रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 170 कोटी रुपये मंजूर करण्यात  आल्याचेही त्यांनी सांगितले.