Breaking News

भारत महासत्ता होण्यासाठी कलामांच्या विचारांची गरज - डॉ. रेड्डी

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - आजच्या युगात वाचनाशिवाय व्यक्तीचा दर्जा उंचावू शकत नाही. वाचाल तर वाचांल या उक्तीप्रमाणे वाचनसंस्कृती टिकविणे हे आजच्या तरूण पिढीसमोरचे मोठे आव्हान आहे. शिक्षण आणि करियरची ओढ प्रत्येक विद्यार्थ्याला,त्याच्या पालकांना असली तरीही विद्यार्थीदशेतच अवांतर वाचन, साहित्य वाचन केले तर व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होेते.मानवी जीवनात वाचन कौशल्याला अनन्यसाधारण महत्त्व असून वाचनामुळे माणसाची सद्सदविवेक बुध्दी जागृत होऊन योग्य निर्णयक्षमतेचा विकास होतो. शिक्षणप्रक्रिया गतिमान करून भारत महासत्ता होण्यासाठी कलामांच्या विचारांची गरज असल्याचे मतप्रतिपादन प्राचार्य डॉ. पी. गोपाल रेड्डी यांनी केले.
पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ (ता.राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभाग आयोजित वाचन प्रेरणा  दिन कार्यक्रमप्रसंगी डॉ.रेड्डी बोलत होते. भारतरत्न (स्व.)डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. गोपाल रेड्डी  अध्यक्षस्थानी होते. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने ग्रंथालय विभागाने खुले ग्रंथप्रदर्शन विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचेकरीता उपलब्ध करून दिले  होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन. शिंगोटे, डॉ. जी. आर. पांढरे, डॉ. ए. एम. भोसले, प्रा. एस. डी. पुलाटे, प्रा. सी. एस. कार्ले, डॉ. के. व्ही. पलघडमल, प्रा. ए. ए. चोरमुंगे, प्रा.  आर. एस. गाढे, एस. आर. गुळवे, श्री. महेंद्र तांबे, श्री. डी. एस. बेंद्रे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. रेड्डी म्हणाले, सध्या टी.व्ही. मुळे लोक निरीक्षर बनले आहेेत. घरातील वाचनसंस्कृती हरवली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पाठयपुस्तके न अभ्यासता इतरही अवांतर पुस्तक  - ग्रंथ साहित्याचे वाचन करून समाजाचा अभ्यास केला पाहिजे. वाचनामुळे ज्ञान वाढते. ज्ञान वाढल्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होवून जीवनात यश मिळते. आजच्या  स्पर्धात्मक युगात याची खूप गरज आहे.समाजाचे प्रतिबिंब खर्‍या अर्थाने पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिकातून लिहिले जाते.समाजाला सुसंस्कृत करण्याचे काम साहित्य करत आहे. मात्र  वैचारिक परिवर्तन घडविण्याची ताकद असलेली पुस्तके घरातून हद्दपार होऊ लागली आहेत. ज्ञानामध्ये केलेली गुंतवणूक सर्वाधिक व्याज देते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा. अंकुश सूर्यवंशी म्हणाले,पुस्तके आपले आचार, विचार, उच्चार आणि व्यक्तिमत्त्व घडवतात. खरेतर ग्रंथाच्या सान्निध्यातच जगण्याला अर्थ  सापडतो.महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. डॉ. विजया तांबे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी-विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.