Breaking News

विवाहितेने त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

अहमदनगर, दि. 27, ऑक्टोबर - तालुक्यातील शेडगाव येथील बत्तीस वर्षीय महिला मनीषा आप्पा झेंडे या विवाहितेने सासरच्या लोकांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून दि 24ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्त्या घराशेजारील विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली . या घटनेची  मयत महिलेचा भाऊ गणेश अशोक मोरे (रा कौठा ता श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा पो ठाण्यात फिर्याद दिली .  त्यावरून  मयत महिलेच्या पती आप्पा शिवराम झेंडे( रा . शेडगाव),नणंद कविता देविदास शिंदे( रा शिंदा ता कर्जत),संगीता दाळींबे( रा शिरापूर ता दौंड जि पुणे) या तिघा आरोपींविरोधात श्रीगोंदा पो ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे 
याबाबत मिळालेली  माहिती अशी की मनीषा आप्पा झेंडे यांचा पाच वर्षांपूर्वी  शेडगाव येथील आप्पा झेंडे यांच्यासोबत विवाह झाला होता . लग्नानंतर मनीषाच्या  पतीला  आप्पा झें डेना दारूचे व्यसन लागले.  ते कोणताच कामधंदाही करत नव्हते . घरी पत्नी  मनीषा हिला मारहाण करून त्रास द्यायचा व  तिला माहेरी कौठा येथे पैसे आणण्यासाठी पाठवायचा.   तसेच मयत मनीषा यांच्या दोन नंदा देखील माहेरी शेडगावला आल्यावर मनीषाला  त्रास देऊन मारहाण करीत होत्या.  वारंवार समजून सांगूनही तिचा नवरा आप्पा यांच्यात काही  बदल होत नव्हता. ऑगस्ट 2017 मध्ये सुद्धा मनिषाचा पती आप्पा याने तिला जबर मारहाण केली होती तेव्हादेखील जवळपास महिनाभर मनिषा ही माहेरी राहिली.दि 24 ऑक्टोबर  रोजी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास शेडगाव येथील विहिरीत मनीषा आप्पा झेंडे हिचा मृतदेह आढळून आला.  याबाबत शेडगावच्या पोलीस पाटलांनी मयत मनिषच्या  माहेरच्या लोकांना माहिती दिली.  मनीषा ही मयत झाल्यामुळे तिचे माहेरचे लोक खूप चिडले होते मयताच्या पतीला आमच्यासमोर आणा त्याशिवाय मयत मनिषयाचा मृतदेह बाहेर क ाढू देणार नाही अशी भूमिका मयत मनीषाच्या  माहेरच्या लोकांनी घेतल्यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला.
श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर  पाऊण तासाच्या आतच सहायक पो निरीक्षक निलेश कांबळे हे त्यांच्या सहकाऱयांसोबत घटनास्थळी पोहोचले. तेथील तणावपूर्ण प रिस्थिती संयमाने हाताळत जे आरोपी आहेत  त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन जमावाला शांत केले.
याघटनेबाबत श्रीगोंदा पो ठाण्यात मयत  मनीषा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून पती व दोन नंदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून मयताचा पती आप्पा  शिवराम झेंडे याला तात्काळ अटक केली आहे पुढील तपास सहायक पो निरीक्षक निलेश कांबळे हे करीत आहेत.