Breaking News

उपराष्ट्रपतींच्या हस्ते राज्यपाल विद्यासागर राव यांच्या ॠदोज इव्हेंटफूल डेज’ पुस्तकाचे चेन्नई येथे प्रकाशन

मुंबई, दि. 17, ऑक्टोबर - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज राजभवन चेन्नई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या तामिळनाडू येथील राज्यपालपदाच्या  13 महिन्यांच्या कार्याकाळावर आधारित एका कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन केले.
यावेळी व्यंकय्या नायडू यांनी पुस्तकाची पहिली प्रत तामिळनाडूचे नवनियुक्त राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांचेकडे सुपूर्द केली. कार्यक्रमाला विद्यासागर राव, तामिळनाडूचे  मुख्यमंत्री इडापडी पलाणीस्वामी, राज्याच्या मुख्य सचिव डॉ. गिरीजा वैद्यनाथन, तामिळनाडू राज्यपालांचे प्रधान सचिव रमेश चंद मीणा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
नायडू यांच्या हस्ते यावेळी तामिलनाडू राजभवन येथे 400 किलोवाट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाचे देखील लोकार्पण करण्यात आले. ‘दोज इव्हेंटफूल डेज’ हे पुस्तक राजभवन  चेन्नईने प्रकाशित केले असून राव यांच्या कारकिर्दीतील विविध घटनांची तसेच त्यांनी सुरु केलेल्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची त्यात सचित्र व सटीप माहिती देण्यात आली  आहे.