Breaking News

लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. दीपा क्षीरसागर

औरंगाबाद, दि. 04, ऑक्टोबर - मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) आठव्या लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बीड येथील डॉ.दीपा क्षीरसागर यांची  निवड करण्यात आली आहे . ’मसाप’ चे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी ही घोषणा केली. डॉ. क्षीरसागर या प्रसिध्द साहित्यिका सुहासिनी इर्लेकर  यांच्या कन्या आहेत. बीड येथील केशरकाकू महाविद्यालयाच्या प्राचार्य असून त्यांच्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत मीराबाई यांची मधूराभक्ती’ या मराठी संशोधन ग्रंथाला  डॉ. हे. वि. इनामदार संत साहित्य पुरस्कार’ मिळालेला आहे.या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आहिल्याबाई महिला प्रतिष्ठानच्या संमेलनच्या स्वागताध्यक्षपदी अ‍ॅड.  उषा दराडे असणार आहेत.