पुणे साबांच्या ञिमुर्तींच्या कार्यप्रणालीची साक्ष
जिल्हाधिकारी कार्यालयाची हरित वास्तू
पुणे(विशेष प्रतिनिधी), दि. 09, ऑक्टोबर - महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम खात्याची भ्रष्ट ख्याती सर्वदूर पसरत असतांना पुणे साबां प्रादेशिक विभागाच्या कार्यप्रणालीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रतिष्ठेत मानाचा तुरा खोवला आहे.मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनीवारी उद्घाटन झालेली जिल्हाधिकारी कार्यालयाची ग्रीन बिल्डींग पुणे साबां अभियंत्यांच्या कार्यतत्परतेची प्रामाणिक साक्ष देत उभी आहे.मुख्य अभियंता प्रविण किडे,अधिक्षक अभियंता राजेंद्र रहाणे,कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर या ञिमुर्तींसह अन्य सहकार्यांना त्याचे श्रेय द्यावे लागेल.मुख्यमंञी शनीवारी पुणे दौर्यावर होते.निमित्त होते अर्थातच पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नुतन अत्याधूनिक ग्रीन बिल्डींगचे उद्धघाटन.शासकीय इमारत म्हटले की सार्वजनिक बांधकाम खात्याचा संबंध अनिवार्य म्हणून साबां मंञी चंद्रकांत दादा पाटील यांची उपस्थिती अपरिहार्य.
मुद्दा वेगळा आहे.इकडे पुण्यात ग्रीन बिल्डींगचे मुख्यमंञी आणि साबां मंञ्यांच्या उपस्थितीत उदघाटन होत असतांना तिकडे मुंबई साबां प्रादेशिक विभागाचे धिंडवडे निघत होते.मुख्यमंञी ,साबां मंञी पुणे विभागाचे मुख्यअभियंता प्रविण किडे,अधिक्षक अभियंता राजेंद्र रहाणे,कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्या कल्पकतेतून,तत्परतेतून आणि प्रामाणिक इच्छाशक्तीतून साकारलेल्या स्तुती सुमनांचा वर्षाव करीत असतांना मुंबई शहर इलाखात भ्रष्टतेच्या ठपक्यावरून निलंबनासारखी कारवाई करण्याची नामुष्की ओढवली होती,
हे उदाहरण देण्याचे कारण एव्हढेच की,समाजात दोन प्रकारची माणस असतात.समाजाच्या टाळूवरचं लोणी खाणारे आणि समाजाची बांधिलकी जपून समाजाला सव्याज परतावा देणारे.हीच माणस प्रशासनात येतात.दुसर्या प्रकारची माणस कार्यरत असतील काय घडू शकते याचे ज्वलंत उदाहरण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची हरीत वास्तू.मुख्यअभियंता प्रविण किडे,अधिक्षक अभियंता राजेंद्र रहाणे,कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर या ञिमुर्तींच्या मेहनतीची साक्ष असलेली ही वास्तू साबांची प्रतिष्ठा आहे हे दस्तुरखुद्द मुख्यमंञ्यांनी आपल्या भाषणात नमूद केले आहे.इतकेच नाही तर जिल्हाधिकारी सौरभ राव,अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन,सहकार्यही तितकेच मोलाचे ठरले आहे.या सर्व कार्यमुर्तींना सलाम.