Breaking News

लाचखोर उपायुक्ताच्या घराच्या झडतीत सापडले दीड किलो सोने, चार लाखाची रोकड

औरंगाबाद, दि. 28, ऑक्टोबर - रोजंदारीवरील कर्मचा-यांना कायम करण्यासाठी लिपीकामार्फत एक लाखाची लाच घेतल्याप्रकरणी पकडण्यात आलेला महानगर पालिकेचा  उपायुक्त अय्युब खान नुरखान पठाण याच्या घरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिका-यांना मोठे घबाड सापडले आहे. आयुब खानच्या घरातून दीड किलो सोन्याचे दागिने,  दोन किलो चांदी, 4 लाख 19 हजार 650 रुपयांची रक्कम व अन्य कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. लाच प्रकरणात पकडल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक ारी व कर्मचा-यांनी उपायुक्त अय्युब खान याच्या टाकळकर हौसिंग सोसायटीच्या मागील मदनी कॉलनीतील बंगल्याची झडती घेतली.