Breaking News

अनुदान घेऊन शौचालये न बांधणा-यांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद, दि. 28, ऑक्टोबर - आपल्याकडे शौचालय नसल्याचे पुरावे सादर करून अनुदान घेऊन प्रत्यक्षात शौचालय न बांधत बांधणा-या तब्बल 1,200 नागरिकांवर गुन्हा  दाखल करण्याची प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. या कारवाईने बोगस लाभार्थींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. 
अनुदान घेऊन शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम वॉर्ड कार्यालयांवर सोपविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी दिली. कें द्राने प्रत्येक नागरिकाला शौचालय बांधण्यासाठी 12 हजार रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू केली. 9 हजार नागरिकांनी अनुदानाची मागणी केली. अनुदानाचा पहिला हप्ता  म्हणून 6 हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. 8 हजार लाभार्थ्यांपैकी 6 हजार लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम केल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.  अनुदान घेऊनही शौचालय न बांधणा-या लाभार्थ्यांना वॉर्ड कार्यालय, स्वच्छता निरीक्षक यांच्यामार्फत सूचना देण्यात आली. 10 महिने उलटले तरी शौचालयाचे बांधकाम केले जात  नसल्याने अनुदान लाटणा-या लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. 1,200 लाभार्थ्यांपैकी अनेक लाभार्थ्यांनी अनुदानाची रक्कम खर्च झाल्याचे मनपा अधिका-यांना सां गितले. 50 लाभार्थ्यांवर पोलीस कारवाई केली आहे. वॉर्ड कार्यालयाकडून यादी प्राप्त होताच दोषींवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.