Breaking News

वरळी कोळी सागरी महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचे स्ट़ॉल्स

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - वरळी कोळी सागरी महोत्सवात मुंबईमध्ये असलेल्या कोळी वाड्यातील कोळी महिलांनी या ठिकाणी विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स  लावलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मासळीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळत आहेत. यंदा या वरळी कोळी सागरी महोत्सवाचे 5 वे वर्ष आहे.
वरळीकरांना या 3 दिवसीय महोत्सवात कोळी पद्धतीच्या खाद्यपदार्थांसोबत कोळी गीतांची देखील मेजवानी मिळणार आहे. 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान आयोजित  करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.