Breaking News

धरण उशाला जीव टांगणीला..पिंपळवाडी गावातील घराघरात जायकवाडीचे पाणी

औरंगाबाद, दि. 17, ऑक्टोबर - जायकवाडी धरणालगतच्या पिंपळवाडी या गावातील अनेक घरांत जायकवाडी धरणाचे पाणी शिरले आहे. सध्या ही आवक सुरू असल्याने अनेक  घरांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जायकवाडी धरणाच्या लगत आहे. धरणाच्या धक्याच्या बाजूला असलेल्या घरांच्या परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या  घराच्या भिंतीला ओलावा आला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान यामुळे होणार आहे. आमदार संदीपान भुमरे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, सरपंच साईनाथ सोलाट यांनी पाहणी केली.  घरात शिरलेल्या ठिकाणच्या घराच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा करण्याची मागणी सरपंच सोलाट यांनी आमदार यांच्याकडे केली. पिंपळवाडी पुनर्वसित गाव असून ते जायकवाडी  धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या धक्यालगत आहे. या परिसरात पावसाचे पाणी, औरंगाबाद महानगरपालिकेच्या लिकेज जल वाहिनीचे पाणी धरणातील पाझरते पाणी हे एका ठिकाणी  साचत असल्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. 58 घरांचा कायमचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरपंच साईनाथ सोलाट यांनी आमदार भुमरे यांनी पाहणीसाठी बोल विले होते. या ठिकाणची पाहणी त्यांनी केली. आज जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तत्काळ उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच पाटबंधारे विभागाच्या  वतीने मुरूम टाकून घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुधलवाडीचे सरपंच भाऊ लबडे, मुनाफ शेख, संतोष भिसे आदी उपस्थित होते.