Breaking News

डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने बालिकाश्रमात दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

ठाणे, दि. 26, ऑक्टोबर - दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदा एज्युकेशन सोसायटीचे आनंद विश्‍व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत व खासदार डॉ. श्रीकांत  शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भगिनी निवेदिता बालिकाश्रम, आनंगाव, भिवंडी येथे दिवाळीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 
या कार्यक्रमास शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव गुरुवर्य प्रा. प्रदीप ढवळ, वागळे इस्टेट डॉक्टरअसोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जे. बी. भोर, डॉ. नमिता ढवळ, डॉ. अवधूत वढावकर,  आनंद विश्‍व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. हर्षला लिखिते, विक्रम भोईर, राजन शिरसाट, प्रा. चैताली कानेटकर, अंकुर गुप्ते, भगिनी निवेदिता बालिकाश्रमाच्या  व्यवस्थापिका स्मिता राणे, प्रा. वरदराज बापट आदी मान्यवर तसेच आनंद विश्‍व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक वशिक्षकेतर  कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व आश्रमातील बालिकांनी सादर केलेल्या स्वागतगीताने झाली. त्यानंतर बालिकांनी कविता व गीते सादर करून आपल्या क लागुणांचे दर्शन उपस्थितांना करून दिले. महाविद्यालयातील आजी-माजी विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी आनंद विश्‍व गुरुकुल रात्र महाविद्यालयाच्या राष्ट ्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी स्त्रियांवर होणारे अत्याचार व स्त्री पुरुष समानता या विषयावर पथनाट्य सादर केले. त्यानंतर आश्रमातील बालिकांना भेटवस्तू, शैक्षणिक साहित्य व  खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावतीने संगणकांचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन स्वयंसेवक सुशांत संकपाळ व सोनालीसावंत यांनी केले. बालिकाश्रमाच्या व्यवस्थापिका स्मिता राणे  यांनी आभार मानले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
विद्यार्थ्यांनी आश्रमातील बालिकांसोबत फटाक्यांची आतिषबाजी करण्याचा आनंदही लुटला. यावर्षीची दिवाळी अविस्मरणीय असल्याची व पुढील प्रत्येक दिवाळी अशाच उत्साहात  साजरी करण्याची मनोकामना सर्व विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.