Breaking News

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची विनंती

सांगली, दि. 26, ऑक्टोबर - महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट  खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, संघटक / कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ती यांच्यासाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार  तसेच जेष्ठ क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2014-15, 2015-16 व सन 2016-17 या वर्षाच्या पुरस्कारासाठी अर्ज  दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईनव्दारे मागविण्यात आले आहेत, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेचे उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी दिली.
सन 2014-15, 2015-16 व सन 2016-17 या वर्षासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या त्या आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरिष्ठ  गटातील पदक विजेते पुरूष व महिला खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, संघटक / कार्यकर्ते, क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक / कार्यकर्ती यांचे विहीत  नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारीणीच्या ठरावासह दिनांक 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत अर्जदाराने आपल्या कामगिरीचा तपशिल देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर  करावा. हा अर्ज ुुुर्.ाीालरळवर्ळीीिेीींीं.लेा या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर सादर करावा. ऑनलाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या क ार्यालयात 5 डिसेंबर पूर्वी स्वयंसाक्षांकित प्रमाणपत्रांसह सादर करावी.