Breaking News

मंदिरातील कुंडात पडून चिमुकल्या भावाबहिणीचा मृत्यू

औरंगाबाद, दि. 26, ऑक्टोबर - औरंगाबादलगत असलेल्या हर्सुल गावातील हरसिद्धी माता मंदिराच्या परिसरातील कुंडात बुडून बहीण व भावाचा अतिशय दुर्दैवी अंत झाला.  याबाबत अधिक माहिती अशी की, हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिरात एक खोल कुंड आहे. त्यात नेहमी पाणी असते. या मंदिरात खेळण्यासाठी आलेले संदीप बल्लाळ यांची मुलगी  अनुजा वय वर्षे 9 व मुलगा अनिरूद्ध हे या कुंडात पडले. खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुंडात  शोध घेवून या दोन्ही लहान बालकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची नोंद पोलिस ठाण्यात करून हे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात  आले आहेत.