माजी आ. राजीव राजळे यांचे ह्दयविकारच्या झटक्याने निधन
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे ते मावस भाऊ होते. राजळे यांनी 2014 साली राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूकही लढवली होती. राजळे यांचं व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं. टेक्नोसॅव्ही म्हणूनही त्यांची ओळख होती. राजळेंचा जनसंपर्क दांडगा होता. पाथर्डी तालुक्यातील सत्ताकेंद्रांवर त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. राजळेंच्या अकाली मृत्यूने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. राजळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील आणि भाऊ आहे. राजळे यांच्यावर पाथर्डीत पिंपळगाव कासारला आज म्हणजे रविवारी दुपारी 4.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.