Breaking News

शहरातील अतिक्रमणे आता दिवाळीनंतर !

। कायनेटीक चौकात अतिक्रमण विभागाची कारवाई । उपनगरातील अतिक्रमणांकडेही लक्ष देण्याची मागणी

अहमदनगर, दि. 13, ऑक्टोबर - अखेर बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिमेस सुरुवात झाली.  अनेकदा पोलिस बंदोबस्त मिळत नसल्याने मोहिम थंडावली जात असल्याचे चित्र  दिसते.  शहरात थंडावलेली मोहीम बुधवारीपासून पुन्हा सुरु करण्यात आली. शहरातील कानेटीक चौकात अतिक्रमनण केलेल्या जवळपास 30 टपर्‍या काढण्यात आल्या. कालची मो हिम पुर्ण झाल्यानंतर छोट्या व्यवसायिकांना वाटत होते की, आज मोहिम कोठे सुरु होणार मात्र आज अतिक्रमण प्रमुख सुरेश इथापे हे कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने आज अ तिक्रमण मोहिम थंडावली. आता हीच मोहिम दोन दिवसत विसावा घेऊन दिवाळीनंतर राबविली जाण्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपसून अतिशय जोमाने सुरु असलेली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची मोहीम आता काही काळ थंड होऊन पुन्हा धार्मिकस्थळे आणि हॉस्पीटल यांच्याक डे वळणार की नाही हा प्रश्‍न तसा प्रलंबित आहे. शहरातील अतिक्रमणाचा भाग हा मोठा असला तरी अनेकदा पोलिस संरक्षण मिळत नसल्याने मोहिम थंडावली जात असते.
शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या  प्रमाणात होत असते त्यातच सण उत्सव असल्याने आता  वाहतूक कोंडीला नागरीकांना रोजच तोंड द्यावे लागत असल्याने ही मोहिती राबवली जाते. अनेकदा नागरीकांकडून अतिक्रमणे काढण्याची मागणी करण्यात येत असते. परंतु राजकीय  नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे दुकाने व छोट्े व्यावसाय असल्यास ते लगेच अतिमक्रमण होत असलेल्या ठिकाणी हजर होवून ही मोहिम बंद करण्याचे व तोरा गाजवण्याचा प्रयत्न करत  असल्याने अनेकदा ही मोहीम थंडावली जाते.
मध्यंतरी जुने बसस्थानक व माळीवाडा परिसरात ही मोहीम राबविण्यात आली होती. जुने बसस्थानक चौकापासून मोहिमेस सुरूवात करण्यात आली ती अतिशय चांगल्या पद्धतीने  राबविण्यात आली. मात्र काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परस्थिती निर्माण झाली. अतिक्रमण विभागाने मोहिम झाल्यानंतर पुन्हा अतिक्रमण होणार नाही असे सांगीतले होते. मात्र गुन्हा  दाखल होत नसल्याने सर्वत्र पुन्हा अतिक्रमण झाले आहेत.