खादीच्या उत्पादन व विक्रीला प्रोत्साहन देणार - मुख्यमंत्री
नागपूर, दि. 03, ऑक्टोबर - खादीच्या निर्मित्तीत मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी राज्यात खादी उत्पादनाचा आराखडा तयार करून राज्य खादी बोर्डाच्या माध्यमातून राबविण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्र्यांनी आज गांधीजयंती दिनी सेवाग्राम आश्रमाला भेट दिली. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की,खादीची मागणी वाढत असल्यामुळे विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्हयामध्ये खादी उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची विनंती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानतर्फे मुख्यमंत्र्यांना यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खादी उत्पादनाच्या माध्यमातून युवकांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो रोजगारासाठी खादीचे सुलभ तंत्रज्ञान तसेच खादी पर्यावरण पुरक असल्यामुळे राज्य खादी ग्राम उद्योग तसेच राज्यातील खादी ग्रामोद्योग संस्थांची बैठक घेण्यात येईल त्यानंतर उत्पादनाचा मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणा-या सामान्य कार्यकर्त्यासाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा आश्रम प्रतिष्ठाणतर्फे करण्यात येइल तसेच सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत आश्रम परिसराचा विकास करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
ग्रामीण जीवननोन्न्ती अभियानाअंतर्गंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणे तर्फे तयार करण्यात आलेल्या ट्रेडल पंप तसेच पशुखादयासह विविध उत्पादनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाणी केली ट्रेडल पंपाच्या माध्यमातून विजेशिवाय परसबाग, फुल शेती तसेच छोट्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते त्यामुळे अल्पभुधारक शेतकर्यांना या पंपाचा लाभ देण्याची सुचना फडणवीस यांनी केली.