कोचीवेल्ली-पोरबंदर एक्स्प्रेसमधून व्होडक्याच्या 2 हजार बाटल्या जप्त
कल्याण, दि. 03, ऑक्टोबर - कल्याण रेल्वे पोलिसांनी कोचीवेल्ली-पोरबंदर एक्स्प्रेसमधून नेण्यात येणा-या व्होडक्याच्या 2 हजार बाटल्या आज जप्त केल्या. पनवेल ते कोपर स्थानकांदरम्यान या गाडीच्या सामान्य डब्यात केलेल्या तपासात हा मद्यसाठा ताब्यात घेण्यात आला.
गोव्यातील मडगाव स्थानकात ही गाडी आली असता त्यात मोठा मद्यसाठा चढवण्यात आला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. सामान्य डब्यातील शौचालयाच्या छताच्या आत या बाटल्या लपवण्यात आल्या होत्या.