Breaking News

लाच घेताना 9 महिन्यांत 32 जण सापडले; 38 जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर, दि. 01, नोव्हेंबर - लाच मागणार्‍यांविरुद्ध तक्रार देण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. जनजागृती वाढतेय. लाच घेताना मागील नऊ महिन्यांत 32 जणांना पकडण्यात  आले असून, 38 जणांंवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांनी पत्रकारांना दिली. मुख्य म्हणजे पोलिस महसूल विभागात  जास्त कारवाई झाली. सोमवारपासून (दि. 30) दक्षता सप्ताह आयोजिण्यात आली आहे. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये  या ठिकाणी फलक लावणे, सप्ताहाबाबत माहिती देणे, शहरात रॅली काढणे, शासकीय कार्यालयात शपथ देणे असे उपक्रम हाती घेण्यात आले आहे. तसेच रिक्षा, ट्रक, टेम्पो चालक,  मालक संघटना यांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. वाहनांवर स्टिकर लावण्यासाठी मोहीम घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातही खास कार्यक्रम घेण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना उपअधीक्षक देवकर म्हणाले, पुणे ठाणे नंतर सोलापूर एसीबी पथकाची कारवाई अग्रेसर असल्याचा  दावा आहे. लोकांमध्ये तक्रार देण्यासाठी जागृती झाली आहे. बांधकाम खाते, सहकार खाते, शासकीय कार्यालयातील एजंट यांच्याविरुद्ध तक्रारी येत आहेत.
एकूण कारवाई 32, आरोपी - 38पोलिस आयुक्तालयात दक्षता सप्ताहअंतर्गत अधिकारी कर्मचार्‍यांनी शपथ घेतली. या वेळी आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त पौर्णिमा चौगुले, नामदेव  चव्हाण. शर्मिष्ठा घारगे, यशवंत केडगे, सूर्यकांत पाटील.