Breaking News

मेट्रो 7 च्या कामादरम्यान पिलर कोसळून कामगार जखमी

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - गोरेगावनजीक मेट्रो 7 चे काम सुरू असताना पिलर कोसळून आज एक कामगार जखमी झाला. मात्र यात जीवितहानी झाली  नाही. अंधेरी ते दहिसर दरम्यान मेट्रो 7 चे काम सध्या सुरू आहे. या टप्प्यातील गोरेगाव ते आरे कॉलनी दरम्यान पश्‍चिम द्रूतगती महामार्गावरील पिलर  कोसळून हा अपघात झाला. पिलर कोसळला तेव्हा सुदैवाने बाजूला कोणतेही वाहन जात नसल्याने मोठी जीवितहानी किंवा अपघात टळला.
अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद, आरे, पठाणवाडी, पुष्पा पार्क, बाणडोंगरी, महिंद्रा अँड महिंद्रा,  मागाठाणे, देवीपाडा, नॅशनल पार्क, ओव्हरीपाडा आणि दहिसर पूर्व अशी स्थानके असणार आहेत. या प्रकल्पाला 6 हजार 208 कोटी रुपये इतका खर्च  अपेक्षित आहे.