Breaking News

मोशी टोलनाक्याजवळ 8 कंपन्यांच्या गोडाऊनला भीषण आग

पुणे, दि. 22, ऑक्टोबर - पुणे जिल्ह्यातील मोशी टोलनाक्याच्या चिंबळी फाट्याजवळील शिप इंडिया कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्नीशमन  दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीने रौद्र रूप धारण केले असून आजूबाजूच्या 8 कंपन्यांच्या गोडाऊनमध्येही ही आग पसरली आहे. यात महिंद्रा  लॉजिस्टिक कंपनीच्या गोडाऊनचाही समावेश आहे. घटनास्थळी 8 अग्नीशमन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू  आहेत.
काही कंपन्यांमध्ये लागलेली आग विझवण्यात आली असली परिसर थंड (कूलिंग ऑपरेशन) करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कंपनीच्या  गोडाऊनमधील प्लास्टिकच्या साहित्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीचे गोडाऊन येथील 7  हजार चौरस फूट परिसरात विस्तारले आहे.