Breaking News

नवे उपक्रम करायचे तर आपल्या गावापासूनच करा - अनासपुरे

नांदेड, दि. 26, ऑक्टोबर - जे काही उपक्रम करायचे आहेत ते आपल्या गावापासून सुरु करा, असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले. मुखेड तालुक्यातील ‘किर्तीवंत  भूमी पूत्रांना हाक आईची’ या शीर्षकाखाली येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी डॉ़  विरूपाक्ष शिवाचार्य महाराज होते़ व्यासपीठावर माजी आ़. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, समाज कल्याण विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ़. सदानंद पाटील प्राचार्य नागोराव कुंभार होते  जिव्हाळा मित्र समुहाच्या माध्यमातून वाचनालय, व्यायामशाळा उभारा, यातून वाचकांची भूक वाढेल. वाचनालयात सर्व विषयावरील पुस्तके ठेवा असे अवाहन त्यांनी केले.