Breaking News

दिवसाढवळ्या ’स्विफ्ट’ ची काच फोडून 3 लाख रुपये लंपास

पुणे, दि. 24, ऑक्टोबर - रस्त्यावर उभ्या स्विफ्ट चारचाकीची काच फोडून अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या 3 लाख रुपये लंपास केले. ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास दा ैंड तालुक्यातील बोरिपार्धी गावच्या हद्दीत केडगाव चौफुला रोडवर घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, ही चोरी तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.
या चोरी प्रकरणी विकास संतराम भागवत (28, रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी आहे की,  फिर्यादी भागवत हे आपली स्विफ्ट कार (क्र. एमएच-42 एच 3070) ही केडगाव - चौफुला रोडच्या कडेला श्री फर्निचर नावाच्या दुकानासमोर उभी केली होती. यावेळी अज्ञात  चोरट्याने काच फोडून स्विफ्ट कारमधील कप्प्यामध्ये ठेवलेले रोख रक्कम 3 लाख रुपये आणि पासबुक-चेकबुक अशी कागदपत्रे अज्ञात चोरट्याने लंपास केली. यामुळे आता  मोटारीत मोठी रक्कम ठेवण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून, त्यात चोरट्याचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. या चोरीनंतर चोरटा सहक ार्‍याच्या मदतीने दुचाकीवरून पसार झाला. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे करीत  आहेत.