Breaking News

वर्षभरात 29 उपकेंद्रे, सव्वालाख नवीन जोडण्या- महावितरणची वार्षिक प्रगती समाधानकारक

नागपूर, दि. 04, ऑक्टोबर - वीज ग्राहकांना योग्य दाबाने व अंखंडीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणे विदर्भात तब्बल 117 वीजौपकेंद्रे प्रस्तावित केली  असून त्यापैकी 29 उपकेंद्रांची कामे पुर्ण झाल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्याच्या समस्या निकाली लागल्या आहेत. तसेच वर्षभरात सुमारे 1.32 लाख नवीन वीज  जोडण्या देण्यात आल्या. महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयाने गेल्या एक वर्षांत विदर्भातील ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला आहे.
वीज ग्राहकांना लहान-सहान कामांसाठी वारंवार मुंबईला जाण्याची गरज भासू नये, अनेक प्रकारच्या प्रस्तावांना थानिक स्तरावरच मंजूरी मिळावी यासाठी  महावितरणच्या कामांचे विकेंद्रीकरण करण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारीत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे प्रादेशिक संचालक कार्यालयाची  स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2 ऑक्टाँबर 2016 रोजी संपूर्ण विदर्भासाठी नागपूर येथे प्रादेशिक संचालक कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.  आपल्या एका वर्षाच्या कार्यकाळात या कार्यालयाने प्रभावी आणि तत्पर ग्राहकसेवेसाठी विविध प्रकारांच्या उपाययोजना करीत विदर्भातील वीज ग्राहकांना मोठ्या  प्रमाणात दिलासा देण्याचे कार्य केले आहे.