Breaking News

भाळवणीतील 220 केव्ही उपकेंद्राचे सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर, दि. 28, ऑक्टोबर - महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे उभारण्यात आलेल्या 220 केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन सहकार मंत्री  सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. भाळवणी येथे उभारण्यात आलेल्या उपकेंद्रातून 33 केव्हीचे 8 फिडर्स काढण्यात आले आहेत. यामुळे पंढरपूर तालुक्यातील वाखरी,  विठ्ठलवाडी, भंडीशेगाव,पिराची कुरोली, धसूर, भाळवणी, खळवे व पळशी याठिकाणी महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रांना विद्युत पुरवठा करण्यात येणार आहे. भाळवणी येथील 220  केव्ही उपकेंद्रामुळे परिसरात योग्य दाबाने सुरळीत विद्युत पुरवठा होण्यास मदत होणार आहे.