Breaking News

भाजप सरकारमुळे संपूर्ण देश व घटना संकटात - शरद यादव

मुंबई, दि. 28, ऑक्टोबर - भाजप सरकारमुळे आज देश व घटना संकटात आली आहे, असा आरोप संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय नेते शरद यादव यांनी आज येथे काढले. मुंबई क ाँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसतर्फे ॠसांझी विरासत बचाओ’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या 70 वर्षांत ताजमहालबाबत कोणीही विवाद केला नव्हता. ताजमहाल ही देशाची शान आहे. जगातील 7 वे आश्‍चर्य आहे. त्यालाही भाजप सरकारने विवादात ओढले. गाय, लव्ह  जिहाद, घरवापसी, दलित अत्याचार, शेतकरी आत्महत्या, आदिवासी अत्याचार या मुद्यांवर भाजपने देशाला संकटात आणले. भाजप सरकार घटनाही बदलायला निघाले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत तरुणांना रोजगार देणार, गरिबी हटविणार, शेतकरी व कामगार सुखी होणार अशी आश्‍वासने दिली होती. यातील एकही  आश्‍वासनाची पूर्तता केलेली नाही. भाजप फक्त समाजामध्ये कलह व अंधविश्‍वास पसरवत आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप सरकारला उलथवण्याची वेळ आली  आहे, असे उद्गार यादव यांनी काढले.