Breaking News

राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्री फुंडकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण

बुलढाणा, दि. 28, ऑक्टोबर - स्थानिक सहकार विद्यामंदिर येथे आयोजित राज्यस्तर शालेय कराटे स्पर्धेतील विविध वजन गटातील विजेत्या खेळाडूंना बक्षीस वितरण आज 27  ऑक्टोबर रोजी करण्यात आले.
विदर्भात प्रथमच कराटे खेळाच्या राज्यस्तरीय स्पर्धा बुलढाण्यात आयोजित केल्याबाबत कौतूक करून पालकमंत्री पांडुरंग फुंडकर म्हणाले, या स्पर्धांतून खेळाडूंची राष्ट्रीय चमूमध्ये  निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे निश्‍चितच प्रत्येक खेळाडूने जीव ओतून खेळला असेल. भविष्यात या खेळांमधून खेळाडूने आपले करिअर करून देशाचे नाव उंचवावे. खेळामध्ये  प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पदक, गुलाबपुष्प देवून खेळाडूंचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला खेळाडूंचे नातेवाईक, परीक्षक, खेळाडू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.