Breaking News

महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटना 17 ऑक्टोबरपासून संपावर

सोलापूर, दि. 05, ऑक्टोबर - सोलापूर राज्यपरिवहन कर्मचार्‍यांचे वेतन हे इतर क्षेत्रातील महामंडळ राज्य सरकारी कर्मचार्‍यांपेक्षा कमी आहे, या अन्य  मागण्यांसाठी संघटना 17 ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जात असल्याची माहिती संस्थेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सेवा  ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेण्यासह सातवा वेतन आयोग मिळावा अशी मागणी या संघटनेची आहे. मागण्या लागू होईपर्यंत संप सुरूच राहणार आहे. यासंदर्भात  प्रशासनास संघटनेतर्फे 29 सप्टेंबर रोजी नोटीसही दिलेली आहे. पत्रकार परिषदेस शिवाजी देशमुख, संतोष दोशी, विलासराव यादव, नारायण सूर्यवंशी, प्रसाद  अगूरकर उपस्थित होते.