डेहराडूनमध्ये अंमली पदार्थासह भारतीय सैन्याच्या दोन जवानांसह तिघांना अटक
डेहराडून, दि. 12, सप्टेंबर - डेहराडूनमध्ये अंमली पदार्थासह भारतीय सैन्याच्या दोन जवानांसह तिघांना पोलिसांनी आज अटक केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थाची किंमत कोट्यवधी रूपये आहे. पांवटा साहिब राष्ट्रीय महामार्गावर वाहन तपासणीदरम्यान बोलेरो ही चारचाकी पोलिसांनी अडवली होती. तपासणीदरम्यान पोलिसांना अंमली पदार्थ सापडले. फूल सिंग यादव, राज हे भारतीय सैन्यातील दोन जवान डेहराडूनच्या सैन्य रुग्णालयात कार्यरत आहेत. फूल सिंगजवळ एक पिस्तुल मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती डेहराडूनच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक निवेदिता कुकरेती यांनी दिली.