काश्मीरमधील चकमकीत दोन दहशतवादी ठार
जम्मू, दि. 12, सप्टेंबर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ठार झालेले दहशतवादी हे हिज्बुल मुझाहिद्दीनचे होते. त्याचबरोबर अन्य एका दहशतवाद्याला शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली आहे. सयार अहमद वानी आणि दाऊद अहम वानी असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. तर,अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव आरिफ सोनी आहे. सुरक्षा दलाने याच्याकडून एक एके -47 आणि 1 रायफल जप्त केली. मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही चकमक झाली. केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.