मायावतींच्या ‘काशीराम इको गार्डन’मधून मौल्यवान मुर्त्यांची चोरी
लखनौ, दि. 12, सप्टेंबर - बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या ‘कांशीराम इको गार्डन’ या महत्वकांक्षी प्रकल्पामधून काही मौल्यवान मुर्त्यांची चोरी करण्यात आली आहे.याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून तक्रारीच्या आधारावर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक माहिती अहवाल दाखल करुन तपास सुरु केला आहे. आलमबाग येथे जुन्या जेल रोड परिसरात असलेले पर्यावरणपूरक गार्डमधून तांब्याच्या सात मुर्ती चोरीला गेल्या आहेत.