Breaking News

गणेशोत्सव समाज प्रबोधनाचे मोठे व्यासपीठ

अहमदनगर, दि. 02, सप्टेंबर - गणेश उत्सव हा समाज प्रबोधनाचे मोठे व्यासपीठ. असून या उत्सवा द्वारे नेत्रदान देहदान, अवयव दान तसेच पाणी बचतीचे संदेश देण्यात यावे .  या व्यसपीठाचा   जनजागृतीसाठी  जास्त प्रभावीपणे वापर   होऊ शकतो  याच धर्तीवर गणेश उत्सवात मंडळांनी देखावे करावेत अशा कार्यक्रमांना नागरिक स्व:ता होऊन मदत करतात असे सांगून ते म्हणले ज्या वेळी मी नगराध्यक्ष होत्तो तेव्हाच मंडपातील जुगार  बंद करावा असा नारा दिला होता मात्र या माझ्या  घोषणेकडे दुर्लक्ष केले त्यानंतर जुगार व मंडळासमोर  दारू काम वाढले . मुबई धर्तीवर नगरचे मोहरम व पुण्याच्या धर्तीवर नगरचा गणेशोत्व जगभर प्रसिद्ध  होता यामध्ये ग्रामीण भागामधून महिला व पुरुष मंडळी येऊन सहभाग घेत होते मात्र आता उत्सवाचे  बाजारीकरण झाले , उत्सवात तणाव होताना दिसतो त्यामध्ये सामन्याचा सहभाग कमी झाला . यासाठी   मंडळांनी पारंपरिक खेळ व देखावे सादर करावेत उत्सव पापरिक जुन्या रितीरिवाजास धरून असावेत .  आज किती मंडळात दोन वेळेस आरती होते हा संशोधनाचा विषय बनला आहे . पूर्वीच्या काळी  मिरवणुकीत 150 ते 200 मंडळ सहभागी असायचे मात्र आता फक्त 14 ते 15 मंडळाचा सहभाग   असतो .त्या कालची उत्सवातील मजा आता राहिली नाही . संस्कृती जपणारे आता बोटावर  मोजण्याइतकेच मंडळ राहिले आहेत हाही अवलोकनाचा विषय आहे .            
अरुण जगताप आमदार राष्ट्रवादी - काँग्रेस पक्ष, अहमदनगर