Breaking News

मोहटे सेवा सोसायटीच्या संचालकपदी दहिफळे

अहमदनगर, दि. 26, सप्टेंबर - तालुक्यातील मोहटे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या तज्ञ संचालक पदी माजी सरपंच संतोष विक्रम दहिफळे व  व्यापारी अमृत पोपटलाल चोपडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.निवडीनंतर संचालक मंडळाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला.
तालुक्यातील मोहटे येथे नुकतीच विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीला सोसायटीचे अध्यक्ष भीमराव पालवे,  उपाध्यक्ष शिवाजी फुंदे, सदस्य विक्रम दहिफळे,मारुती दहिफळे, भगवान दहिफळे, रेवणनाथ दहिफळे, नामदेव दहिफळे, आजीनाथ दहिफळे, चंद्रकांत दहिफळे, बन्सी  रणमले, एकनाथ सोनवणे, द्वारकाबाई दहिफळे, लक्ष्मीबाई दहीफळे, सचिव अर्जुन बडे, अविनाश फुंदे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या बैठकीत गावातील दोन तज्ञ संचालकांची निवड करण्यात आली.त्यामध्ये माजी सरपंच संतोष विक्रम दहिफळे व व्यापारी अमृत पोपटलाल चोपडा  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.तसे पत्र संस्थेकडून त्यांना देण्यात आले आहेत.निवडीनंतर संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.