Breaking News

राणेंनी टीका करण्याआधी आत्मपरिक्षण करावे - पृथ्वीराज चव्हाण

अकोला, दि. 25, सप्टेंबर - काँग्रेस पक्ष व त्यांच्या नेत्यांवर टीका करणा-या नारायण राणे यांनी आधी स्वत: आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
राणे यांना काँग्रेसची संस्कृती कळली नाही. पदे मुख्यमंत्री बदलत नाही. कोणाला कोणते पद द्यायचे ते पक्षाचे वरिष्ठ नेतेच ठरवतात, असे चव्हाण यांनी सांगितले.  गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, उद्योगमंत्री सुभाष देसाई, प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करावी,  माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना वेगळा न्याय का, असा प्रश्‍नही चव्हाण यांनी विचारला. बुलेट ट्रेनचा निर्णय अत्यंत चुकीचा असून त्याच पैशांत कर्जमाफी  करून शेतक-यांना न्याय देता आला असता, असेही चव्हाण यांनी सांगितले.