Breaking News

मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचा चौकशी अहवाल आयोगाला सादर - उपायुक्त पुजारी

भाईंदर, दि. 25, सप्टेंबर - मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपकडून पैसा व मुनी यांच्या जोरावर बहुमत मिळवल्याप्रकरणाचा चौकशी अहवाल  राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आल्याची माहिती पालिका उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने पैसा व मुनी यांचा वापर करून सत्ता मिळवली, असा आरोप करत शिवसेनेचे नेते खा. अनिल देसाई यांनी केंद्रीय  निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी राज्य निवडणूक आयोगाला चौकशी करण्याचे  आदेश दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला निर्देश दिले होते.