Breaking News

स्वप्नातून ध्येय ठरतात आणि ध्येयातून दिशा सापडत असते - तुकाराम मुंढे

पुणे, दि. 25, सप्टेंबर - स्वप्नातून ध्येय ठरतात आणि ध्येयातून दिशा सापडत असते, असे प्रतिपादन पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  तुकाराम मुंढे यांनी केले. आपण निर्धारित केलेले लक्ष्य गाठण्यासाठी चांगल्या सवयी आवश्यक असतात. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी जीवनातील कोणत्याही परीक्षेत  निश्‍चितपणे यशस्वी होतोच, असेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहरातील दिशा सोशल फाऊंडेशनने प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या संवाद तरुणाईशी या उपक्रमांतर्गत ‘स्पर्धा परीक्षेची  पुर्वतयारी व प्रशासनातील संधी’ या विषयावर मुंढे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी अशोक मुंढे होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे, समन्वयक नाना शिवले, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, भाजपाचे माजी  शहराध्यक्ष सदाशिव खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.