Breaking News

भारत व नेपाळ यांच्यातील संयुक्त लष्करी सराव आजपासून

नवी दिल्ली, दि. 03, सप्टेंबर - भारत व नेपाळ यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाला रविवारपासून सुरुवात होत आहे. हा सराव 16 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.  दोन्ही देशांत केल्या जाणा-या सूर्य किरण या लष्करी सरावाचे हे 12 वे सत्र आहे.
नेपाळमधील सलझंडी येथील आर्मी बॅटल स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सरावात दोन्ही बाजूंकडून प्रत्येकी 350 तुकड्या सहभागी होणार आहेत. या  सरावादरम्यान दहशतवाद विरोधी कारवाया हे लक्ष आहे.
विविध देशांबरोबर केल्या जाणा-या लष्करी सरावांच्या मालिकेत ॠसूर्य किरण’ ही सर्वांत मोठी तुकडी यात सहभागी होणार आहे, असे लष्करी अधिका-यांनी  सांगितले.