Breaking News

अपघाती मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्याचा एसटी महामंडळाला आदेश

पुणे, दि. 01, सप्टेंबर - दुचाकीला जोरदार धडक देऊन नऊ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी न्यायालयाने एसटी महामंडळाला दणका दिला  आहे. एसटी महामंडळाला नुकसान भरपाईपोटी 5 लाख 50 हजार रुपये 9 टक्के व्याजाने देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील 60 टक्के रक्कम मुलाच्या  नावावर तर 40 टक्के रक्कम वडिलांच्या नावावर जमा करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याबाबत मृत मुलाच्या आई-वडिलांनी महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एसटी महामंडळ) यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. 7 नोव्हेंबर 2013 रोजी  सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास याचिकाकर्त्यांचा मुलगा एका योगेश नावाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या दुचाकीवरून मागच्या बाजुला बसून खेड-शिवापूर येथे  जात होता. यावेळी विरुद्ध दिशने भरधाव वेगात आलेल्या एसटी बसने त्यांना शंकरशेठ रोडवरील वेगा सेंटर समोर जोरदार धडक दिली होती. अपघातात जोरदार  जखमी झालेल्या मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला.