नाभिक समाजाचा नगरमध्ये एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
अहमदनगर, दि. 12, सप्टेंबर - गेल्या महिन्यात शेवगाव तालुक्यातील हातगांव कांबी येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सकल नाभिक समाजाच्यावतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. मराठा मोर्चाप्रमाणेच या मोर्चातील चार मुली व तीन महिलांनी जिल्हाधिकार्याां निवेदन दिले. या मोर्चासाठी जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून लोक आले होते. घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हातगांव कांबी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याचा निषेध करण्यात येऊन अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. या मुलीचे आईवडील गावामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करतात. पीडित मुलीच्या कुटुंबीयास मदत करण्यासाठी व आरोपीला लवकरात लवकर व कठोर शिक्षा व्हावी यासाठी नाभिक समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोठा मूकमोर्चा काढण्यात आला.
मूकमोर्चाची सुरवात सकाळी साडेदहाच्या सुमारास गांधींमैदानावर झाली.सकल नाभिक समाज याठिकाणी जमलेला होता. सुरवातीस समाजातील सहा मुली व तीन महिला यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून त्यांची भाषणे झाली. यामध्ये दीपाली शिंदे (नगर),प्राजक्ता अनारसे (राहुरी),देवकर ताई (मुंबई),जागृती सोनवणे (जळगाव),कल्याणी क्षीरसागर (शेवगाव),ज्योती सैंदाणे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली . त्यानंतर या मोर्चास याच मुलींच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली. हा मोर्चा गांधीमैदान-चितळे रोड-तेलीखुंट-दालमंडई-जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. त्यानंतर चार मुलींनी जिल्हाधिकार्यांना निवेदन देत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आदी मागण्या करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी निवेदन स्वीकारीत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.त्यानंतर मोर्चाचे विसर्जन करण्यात आले.यावेळी पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणावर होता. त्याचप्रमाणे मोर्चातील आणि समाजातील स्वयंसेवक शिस्त पाळण्यासाठी प्रयत्न करीत होते. मोर्चा शिस्तबद्धपणे व शांततेत काढण्यात आला. मोर्चेकरांना जागोजागी नाश्ता, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात आली.मोर्चाचे नेृतत्व कोणत्याही पुढार्यांकडे किंवा संघटनेकडे नव्हते. असे आहे निवेदन...
सर्वसामान्य नाभिक जनतेनेच या मोर्चाचे सुत्रे आपल्या ताब्यात घेतले होते.
पीडित मुलीचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा., सदर खटला नगर जिल्ह्यात न चालवता बाहेरील जिल्ह्यात चालवण्यात यावा., आरोपीस निकाल लागेपर्यंत जामीन देऊ नये., पीडित मुलीचे व तिच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करावे., पीडित मुलीच्या कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे., या खटल्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी व आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करावे, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.