Breaking News

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार याची घोषणा शिवाजी  पार्कवर होणार्‍या दसरा मेळाव्यात केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र सरकारला कोणताही धोका नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महागाई विरोधात शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टोकाची घोषणाबाजी करण्यात  आली. शिवाय भाजप आणि शिवसेना नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली. त्यामुळे दोन्ही पक्ष काडीमोड घेणार का, या चर्चेला ऊत आला होता. सत्तात्यागाची  घोषणा दसरा मेळाव्याच्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील, असं बोललं जात होतं. मात्र शिवसेनेचे आमदार फुटणार, अपक्ष किंवा राष्ट्रवादी  भाजपला पाठींबा देणार, अशा शक्यतांना पूर्णविराम देण्यासाठी शिवसेना सत्तेतच राहणार आहे.